आ.प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघातर्फे वृक्षारोपण ...
आ.प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघातर्फे वृक्षारोपण ...

पनवेल वैभव / वार्ताहर :-
आमदार प्रशांत रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम शनिवार दि.१० ऑगस्ट रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पार पडला.५ ऑगस्ट रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ व इतर कोणते शुभेच्छा वस्तू न स्वीकारता वृक्षारोपण करा असे प्रशांत ठाकूर यांनी आव्हान करून समाजात एक उत्तम पायंडा पडला आहे.त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देऊन सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघातर्फे त्यांच्या ५०व्या वाढदिवसाच्या निमित्त ५० वृक्ष पनवेल स्टेशन जवळील ट्रॅफिक लँड मध्ये लावली व त्याची  जोपासना मंडळ करणार आहेत.आमदार नेहमीच मंडळ कार्याला सहकार्य करत असतात त्याप्रमाणे त्यांनी आमच्या सिंधुदुर्ग भवन उभारणी करिता जागा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करतो असे सांगून त्यांनी आत्ता पर्यंत मंडळाने केलेल्या कामाचे कौतुक केले आहे. तुम्ही असेच उपक्रम करत रहा मी माझ्याकडून शक्य ती सर्व मदत करेन असे सांगितले. 
सदर मंडळातर्फे कांचन,बहवा,सोनचाफा कन्हेरे, बकुळ अश्या भारतीय फुले झाडांचे वृक्षारोपण केले आहे व त्याची जोपासना मंडळातर्फ केली जाणार आहे. मंडळाचे अध्यक्ष केशव राणे, उपाध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव रामचंद्र मोचेमाडकर, सहसचिव वासुदेव सावंत, प्रदीप रावले, बाबाजी नेरुरकर यांनी सदर उपक्रमात विशेष मेहनत घेतली. मंडळाचे महिला आणि पुरुष सदस्य मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
Comments