शिवसेनेचा भगवा सप्ताह अंतर्गत महिला आघाडीतर्फे शहर शाखेत प्रदर्शन व विक्री
पनवेल वैभव, दि.13 (वार्ताहर) ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या भगव्या सप्ताहाच्या निमित्ताने आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून पनवेल शहर शाखेतर्फे आई डे केअर पेण या संस्थेतील दिव्यांग मुलामुलींनी बनविलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या, कागदी फुले, तोरणं, कापडी पिशव्या, नॅपकीन बुके, मेणबत्ती इ. अनेक वस्तूंचे दोन दिवसीय प्रदर्शन व विक्री शिवसेना पनवेल शहर शाखा, लाईन आळी येथे लावण्यात आले होते.
आयोजक शहर संघटिका सौ.अर्चना अनिलकुमार कुळकर्णी, शहर प्रमुख प्रवीण जाधव, अच्युत मनोरे, तालुका संघटीका प्रमिला कुरघोडे, उज्वला गावडे, माधवी त्रिवेदी,अश्विनी देसाई, सुजन मुसलोंडकर, नंदू घरत, अरुण ठाकूर, निखिल भगत, पराग मोहिते, कुणाल कुरघोडे, मा. नगराध्यक्षा श्रीमती शुभांगी टाकळे , आदी शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो ः प्रदर्शन व विक्री