शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन
पनवेल / प्रतिनिधी : - 
देशात कोणीही उपाशी पोटी झोपू नये, प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी उन, पाऊस, थंडी, वादळीवारा यांचा विचार न करता, न थकता शेतकरी रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करून अन्नधान्य पिकवतो. भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशातील बहुतांश उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी शेती करणे थांबवील्यास सर्व जनजीवन उध्वस्त होईल. शेतकरी जगेल तरच जग जगेल. परंतू केंद्र व राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्याने शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही, तर शेतकऱ्यांची कर्जमाफी सुध्दा केलेली नाही. हे केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी असून, पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आज दि. २६ जुलै २०२४ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर समोर आंदोलन करण्यात आले व निवेदन देण्यात आले. सदर  निवेदन पत्र उप विभागीय नायब तहसीलदार अनिल जाधव यांनी स्वीकारले. सदर पत्रामध्ये  शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या करीता निवदेन देण्यात आले. 
यावेळी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील, कार्याध्यक्ष श्रुती म्हात्रे, पनवेल शहर जिल्हा युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, पनवेल शहर जिल्हा महिला अध्यक्ष निर्मला म्हात्रे, , मल्लिनाथ गायकवाड, प्रीतेश शाहू, अरुण कुंभार, कांतीभाई गंगर, सुधीर मोरे,  जोस जेम्स, चेतन म्हात्रे, अमित लोखंडे, आरती ठाकूर,आर यु सिंग, कल्पेश गंगर, शाहीद मुल्ला व आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image