करंजाडेचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..
२०० जणांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ..
पनवेल,(प्रतिनिधी) -- काही तरी वेगळ करणारी माणस हे वेगळी असतात त्यांचे ध्येय, तत्व, विचार जरा हटके असतात, त्यामध्ये असे व्यक्तीमत्व असणारे करंजाडे ग्रामपंचायतीचे कार्यतत्पर माजी सरपंच रामेश्वर आंग्रे हे होत. 

काही व्यक्तींच्या रक्तातच मुळात लढवय्यापणा आणि संघर्ष करण्याची मोठी ताकद असते. त्यामुळे अशी मंडळी आव्हानाला आव्हान करून सामोरे जातात. यशापयशाची पर्वा न करता सातत्याने मार्गक्रमण करत असतात असे मत शुक्रवारी ता.19 रोजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू यांनी व्यक्त केले.
यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी, माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश बोरकर, संदीप भास्कर चव्हाण, योगेश भरत राणे, केतन आंग्रे उमेश भोईर, नीलिमा भगत, हेमा गोतमारे, शशांक पोईपकर, महिला सदस्य व ग्रा.सदस्य यांच्यासह जेष्ठ नागरिक, विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी अपोलो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आरोग्य तपासणी शिबीरा चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे 200 जणांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये शुगर लेवल, रक्त गट, दातांची तपासणी, हाडांची ढिसूळता घनता, स्त्रीरोग तंज्ञाकडून तपासणी व मार्गदर्शन, 
त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा करंजाडे येथील 1 ली ते 6 वी पर्यंतच्या विध्यार्थीना वह्याचे वाटप करण्यात आले. यावेळी करंजाडे येथील जेष्ठ नागरिकांनी देखील वाढदिवस मोठया उत्साहात साजरा केला यावेळी जेष्ठानी आपली मनोगते व्यक्त केली.
Comments