नवीन पनवेल येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव ...
नवीन पनवेल येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव ...


नवीन पनवेल / प्रतिनिधी - : अंजनी क्लासेस नवीन पनवेल तर्फे शिमला आणि पुणे येथे पारितोषिके जिंकलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, यांच्यासह अंजनी सराफ संस्थापिका अंजनी क्लासेस, चंचला बनकर खारघर महिला शहर प्रमुख शिवसेना, कुंदा गोळे शिवसेना जिल्हाप्रमुख महिला, रिंन्हे सुबरवाल, महागुरु युसुफ गुंज डान्स अकॅडमी, जितेंद्र तिवारी, सुनील सिन्हा यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.  
      
 नवीन पनवेल मधील कर्नाटक हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कुशल नागा गुबला, सार्थक संतोष वाघमारे, अक्षरा प्रवीण सूर्यवंशी, जीविका समीर माने, रियांका कुणाल जाधव, देवश्री बलहारे, यतिश्या शेलार, श्रेया गोसावी, नित्या बल्हारे, आर्यन राज, सुधांशू शेखर, आयुशी कुमारी, समृद्धी गुप्ता, धनवी सावंत, श्रेया होनमाने, उत्कर्ष होनमाने, ग्रीष्मा भोईर, आराध्या जाधव यांचा ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. यावेळी भाजपचे बाळासाहेब पाटील यांनी या कार्यक्रमाचे विशेष कौतुक करत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या नैपुण्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
Comments