लायन्स पनवेल सरगम तर्फे योग दिवस साजरा
पनवेल / वार्ताहर : -
लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे गोखले सभागृह, पनवेल येथे मोठ्या उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी नगरसेवक नितीन पाटील तर विशेष अतिथी म्हणुन रिजन चेअरमन सुयोग पेंडसे आणि जेष्ठ पत्रकार संजय कदम हे उपस्थित होते. योग प्रशिक्षक स्नेहा पेंडसे यांनी उपस्थितांना योग विषयक मार्गदर्शन केले आणि योगासने करुन घेतली. प्रमुख अतिथी नितीन पाटील यांनी योग दिनाचे महत्त्व सांगितले आणि सरगम क्लबच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विशेष अतिथी संजय कदम यांनी सरगम क्लब करत असलेल्या कार्याचे कौतुक केले आणि उपक्रमांना नेहमीच माध्यमातून प्रसिद्धी देऊ असे सांगितले. क्लबच्या अध्यक्ष स्वाती गोडसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
या वेळी सरगम क्लबचे मानदा पंडित, प्रेमेंद्र बहिरा, संजय गोडसे, जयेश मणियार, प्रकाश भारद्वाज तसेच योग प्रेमी उपस्थित होते.