अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते "सासरवाडी" आस्वादगृहाचे उद्घाटन...
जिभेचे चोचले पुरवणारी "सासरवाडी" आस्वादगृह खारघरकरांच्या सेवेत रुजू


नवी मुंबई / प्रतिनिधी :-
महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर खास खवय्यांसाठी सीवूड्स व बेलापूर  शाखेनंतर आता खारघर मध्ये सुद्धा आपली तिसरी शाखा घेऊन "सासरवाडी" हे आस्वादगृह सेवेत रुजू झाले आहे. फारच कमी वेळात लोकप्रिय झालेले हे आस्वादगृह शनिवारपासून खारघर सेक्टर १३ मध्ये शॉप नंबर ३, मोंट ब्लॅक, रघुनाथ रोड या पत्त्यावर खारघरकरांकरिता जिभेचे चोचले पुरवण्याकरिता उपलब्ध  असेल. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते "सासरवाडी" रेस्टॉरंटचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर  तसेच  मोठ्या संख्येने शुभचिंतक उपस्थित होते. 
उद्घाटनाप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सांगितले की " सासरवाडी रेस्टॉरंट च्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन होत आहे यातच आपण समजून घ्या की बाकी शाखा जोमात सुरू आहेत. यातच यश दडलेले आहे . मी दुसऱ्यांदा  उद्घाटनाप्रसंगी उपस्थित राहिले. यापूर्वी सुद्धा माझ्या हस्ते याआधीच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले होते. यात मला एक कलाकार म्हणून आनंद वाटतो. यानंतर सुद्धा मी परत परत येणार कारण येथील पदार्थ मला खूप आवडतात मी सुद्धा सासरवाडी या रेस्टॉरंट ची एक ग्राहक असून मला या ठिकाणी मसालेभात, मोदक वरण-भात हे पदार्थ खूप आवडतात. मी या रेस्टॉरंटची एक चाहती आहे. विशेष म्हणजे माझ्या हस्ते या रेस्टॉरंट चे उद्घाटन होत आहे याचा मला खूप आनंद होतोय."
या आस्वादगृहाच्या संचालिका ॲडव्होकेट सोनाली धामणीकर यांच्या संकल्पनेतून नवी मुंबईत सीबीडी बेलापूर सेक्टर ११, बालाजी भवन येथे ४० आसन व्यवस्थेचे तर सीवूड्स सेक्टर ४८ येथे ५५ आसन व्यवस्थेचे हॉटेल असून खवय्यांचा या शाखेला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्यामुळेच खारघर येतील खवय्यांना सुद्धा  गावरान मटन, तांबडा पांढरा रस्सा, सावजी मटण तसेच शाकाहारी खवय्यांसाठी मटकी मिसळ , मासवडी रस्सा, पिठलं भाकरी, अळूवडी, कोथिंबीर वडी, मोदक असे विशिष्ट पूर्ण पदार्थ ७० एवढी आसन व्यवस्था असणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये लज्जतदार आस्वाद घेण्यास मिळणार  असल्याचे संचालिका ॲडव्होकेट सोनाली धामणीकर यांनी पत्रकारांना सांगितले.
Comments