मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्या : माजी नगरसेवक लतीफ शेख
भरघोस मतांनी निवडून द्या : माजी नगरसेवक लतीफ शेख

पनवेल वैभव / प्रतिनिधी : -
मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना भरघोस मतांनी नागरिकांनी निवडून द्यावे तसेच आता येथील नागरिकाना बदल हवा आहे त्यासाठी मोहल्ल्यातील नागरिक निश्चित मोठया प्रमाणात मतदान करतील असे विधान माध्यमांशी बोलताना माजी नगरसेवक लतीफ शेख यांनी पनवेल मुसलमान नाका येथील कॉर्नर प्रचार सभेत केले.

यावेळी महाविकास आघाडीचे आमदार जयंत भाई पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, इतिहासाचे अभ्यासक सैफुद्दीन शेख, आर सी घरत, हेमराज म्हात्रे, दीपक निकम, आरिफ पटेल, नारायण शेठ घरत, प्रवीण जाधव, जुनेद पवार आदी उपस्थित होते. याप्रसंगी मोठया प्रमाणात मुस्लिम बांधव सभेसाठी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा. नगरसेवक लतीफ शेख यांनी सांगितले की बहुतांश लोकांना आपले विद्यमान खासदार पनवेल मध्ये आलेले माहीत नाहीत. त्यांच्या माध्यमातून पासपोर्ट ऑफिस येणार होते ते देखील आलेले नाही, ते मोदींच्या नावाने मते मागतात तर मोदींनी इथे केलेली पाच तरी कामे दाखवा असे आवाहन लतीफ शेख यांनी केले.पनवेल ला यावेळी बदल हवा आहे आणि आमचे बांधव निश्चित हा बदल घडवून आणायला मदत करतील. हे कुठल्या पार्टीसाठी मतदान न करता देशासाठी मतदान करतील. भविष्यात स्थानिक कंपन्या गुजरातला न जाता त्याचा फायदा आपल्या स्थानिक लोकांना झाला पाहिजे. यासाठी नागरिकांनी इंडिया आघाडीला मतदान करायला पाहिजे व मावळचे लोकसभेचे उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन यावेळी माजी नगरसेवक लतीफ शेख यांनी केले.
Comments