स्नेहलता जुमलेदार यांचे निधन
स्नेहलता जुमलेदार यांचे निधन 

पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः कर्नाळा ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य तसेच पद्मश्री  अनुताई वाघ यांच्या सोबत काम केलेल्या कल्हे गावातील सामाजिक कार्यकर्त्या स्नेहलता राजाराम जुमलेदार(89) यांचे वृद्धपकाळाने राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पश्‍चात एक मुलगा , नातवंडे असा परिवार आहे. जुमलेदार यांच्यावर कल्हे गावातील स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडले. यावेळी नातेवाईक तसेच पंचक्रोषीत नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.


फोटो ः स्नेहलता जुमलेदार
Comments