महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ ; बुलंद तोफ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज खारघरमध्ये...
महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ ; बुलंद तोफ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज खारघरमध्ये... 


पनवेल (प्रतिनिधी) 
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ बुलंद तोफ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवार दिनांक ०६ मे रोजी दुपारी ३.३० वाजता खारघर येथे भव्य जाहीर प्रचार सभा होणार आहे. 
          सेक्टर १९ मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या भव्य मैदानावर होणाऱ्या या सभेला महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, विधानसभा निवडणूक प्रमुख नितीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, रासपचे अण्णा वावरे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 
Comments
Popular posts
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image