पनवेल शहर पोेलिसांंनी घेतले देेशी बनावटीच्या अग्नीशस्त्रासह एका तरुणास ताब्यात..
अग्नीशस्त्रासह एक तरुण पोलिसांच्या ताब्यात..

पनवेल, दि.16 (संजय कदम) ः सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांच्या मुंबई येथील निवासस्थानी गोळीबार करणारे दोघे जण पनवेल तालुक्यात वास्तव्यास होते. याच पार्श्‍वभूमीवर व लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पोलिसांचा तपास सर्वत्र सुरू असताना पनवेल शहर पोलिसांनी एका तरुणाला देशी बनावटीच्या अग्नीशस्त्रासह 5 जीवंत काडतुसे जवळ बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेेतले असल्याने पनवेल परिसरात खळबळ उडाली आहे.
पनवेल एसटी स्टँडच्या मागील बाजूस पनवेल रेल्वे स्टेशनच्या दिशेने एक इसम अग्निशस्त्र घेऊन एक इसम येणार असले बाबत पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांना बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल रेल्वे स्टेशन व पनवेल एसटी स्टँड परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे,  पो.हवा. परेश म्हात्रे, पो ह नितीन वाघमारे, पो शि  प्रसाद घरत, पो. कॉ. विशाल दुधे यांनी सदर ठिकाणी पाळत ठेवून अग्निशस्त्र घेऊन येणारा इसम नामे पवन जसवंत सागर वय 18 वर्ष 08 महिने  रा. गाजियाबाद यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे 15.5 इंच लांबीचे भारतीय देशी बनावटीचे अग्निशस्त्र व 5 जिवंत काडतुसे  मिळून आल्याने त्याचेवर पनवेल शहर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)135 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.


फोटो ः संग्रहीत
Comments