पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
पनवेल शहर पोलिसांनी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु

पनवेल वैभव , दि.२१ (संजय कदम) ः पनवेल शहराजवळील नांदगाव जवळील पाच पीर डोंगर निसर्ग हॉटेलच्या मागे डी पॉईंट येथे आज सकाळी नेरुळ परिसरात राहणारे एक कुटुंब व त्यांचा मित्र परिवार असे ८ जण ट्रेकींगसाठी गेले असता ते मुसळधार पाऊस व धुक्यामुळे भरकटले होते. परंतु स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पनवेल शहर पोलिसांनी या आठही जणांना रेस्क्यु करून सुखरुपपणे खाली उतरविले आहे.
नवी मुंबई येथील नेरुळ या ठिकाणी राहणारे पवार कुटुंबिय व त्यांचा मित्र परिवार असे ८ जण आज सकाळी ११ च्या सुमारास पनवेल शहराजवळील नांदगाव जवळील पाच पीर डोंगरावर ट्रेकींगसाठी गेले होते. परंतु दुपारच्या वेळेस अचानकपणे वाढलेला पाऊस व दाट धुक्यामुळे ते रस्ता चुकले व भलत्याच ठिकाणी पोहोचले. आपण वाट चुकल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आपत्कालीन विभागाशी संपर्क साधला. तात्काळ सदर विभागाने पनवेल शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधून अडकलेल्या ८ जणांबाबत माहिती दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण भगत, सहा.पो.निरीक्षक केदार, पो.उपनिरीक्षक विनोद लबडे, पो.हवालदार किशोर बोरसे, परेश म्हात्रे, पो.हवा.मुरली पाटील, पोलीस नाईक भाऊसाहेब लोंढे, यांच्यासह नांदगांवचे मा.सरपंच संजय पाटील, अ‍ॅड.घरत व ग्रामस्थ त्यांच्या मदतीला धावले व त्यांनी सदर डोंगर पिंजून काढून २ तासानंतर या ८ जणांना ताब्यात घेवून सुखरुपपणे खाली उतरविले. याबद्दल या ८ जणांनी पनवेल शहर पोलीस व ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.



फोटो ः रेक्स्यु
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image