६ महिन्यापुर्वी महिलेचा गळा दाबुन खून करून पळून गेलेल्या अज्ञात आरोपीला मध्यवर्ती कक्ष गुन्हेशाखेने केली अटक ; प्रेम संबंधातून हत्या केल्याचे तपासात उघड..
 प्रेम संबंधातून हत्या केल्याचे तपासात उघड..


पनवेल दि.०२(संजय कदम):  पनवेल मधील भिंगारी गावातील निर्जलस्थळी ६ महिन्यापुर्वी महिलेचा गळा दाबुन खून करून पळून गेलेल्या अज्ञात आरोपीला मध्यवर्ती कक्ष, गुन्हेशाखा नवी मुंबई यांनी अटक केली आहे. पांडव गोरख जाधव उर्फ पांडया (वय २१ वर्षे रा. मालधक्का झोपडपट्टी पनवेल) असे या आरोपीचे नाव आहे.
          भिंगारी गावच्या निर्जनस्थळी १० ऑक्टोबर २०२३  ला एका महिलेचा खुन झाल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा समांतर तपास पोलीस आयुक्त, मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई, अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्ष, गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सपोनि हर्षल कदम, सपोनि दशरथ विटकर, सपोनि शशिकांत पवार, सपोनि श्रीनिवास तुंगेनवार, सपोनि घेगडमल, सपोनि अलका पाटील, सफौ. मंगेश वाट, मपोहवा उर्मिला बोराडे, पोहवा नितीन जगताप, पोहवा शशिकांत शेंडगे, पोहवा अनिल यादव, पोहवा महेश पाटील, पोना महेश अहिरे, पोना सचिन टिके, पोना अजय कदम, पोना निलेश किंद्रे, पोना सतिश चव्हाण, पोशि अशोक पाईकराव, पोशि नितीन परोडवाड यांच्या पथकाने सुरु केला असता तांत्रीक तपास व मयत महिला हिचे संपर्कात असणाऱ्या व्यक्ती व परिसरात राहत असणाऱ्या व्यक्ती यांच्याकडील माहितीच्या आधारे व गुप्तबातमीदार यांनी मयत महिले सोबत राहणारा अनोळखी इसम याबाबत दिलेली माहिती, त्याबाबतचा तपास व मयत महिलेचा खुन झाल्यापासुन सातत्यपुर्ण केलेला तपास यावरून सदर महिलेचा गळा दाबुन परांगदा झालेल्या अनोळखी इसम यानेच खुन केल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न केले. अनोळखी इसम हा २९ मार्च २०२४ रोजी ओरियन मॉल पनवेल येथे असल्याबाबतची माहिती पो. हवा  महेश पाटील यांना मिळाल्याने मध्यवर्ती कक्षाचे वपोनि सुनिल शिंदे यांनी तात्काळ सपोनि अलका पाटील, सफौ. मंगेश वाट, मपोहवा बोराडे यांचे पथक पाठवुन  पांडव गोरख जाधव उर्फ पांडया (वय २१ वर्षे) याला शिताफिने ताब्यात घेवुन मध्यवर्ती कक्ष, गुन्हेशाखा बेलापुर नवी मुंबई येथील कक्षात आणले. त्याचेकडे सतत ७ ते ८ तास कौशल्यपुर्ण चौकशी करून तो गुन्हा घडल्यापासुन स्वतःचे अस्तित्व बदलुन महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये व गुजरात राज्यातील सुरत येथे राहत असल्याचे सांगुन गुन्हा केल्याची कबुली दिल्याने पुढील तपासकामी पनवेल शहर पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले. अटक आरोपी व मयत महिला यांचे प्रेमसंबध असुन घटनेच्या दिवशी आरोपी व मयत महिला यांनी दारू पिवुन आपसात झालेल्या भांडणातुन आरोपी याने मयत महिलेचा गळा दाबुन खुन केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. 
फोटो: आरोपी पांडव गोरख जाधव उर्फ पांडया सह पोलिसांचे पथक
Comments