रोहा येथे 'कॅन्सर मुक्त नारी' कार्यक्रमात बी के डॉ. शुभदा नील यांचे मोलाचे मार्गदर्शन..
डिवाइन संस्कार रिसर्च फाऊंडेशन द्वारा कार्यक्रमाचे आयोजन..

पनवेल / वार्ताहर : - 
कॅन्सर मुक्त रहे नारी, जग को जीवन देने वाली नारी स्वस्थ रहे या गीताने मातोश्री मंगल कार्यालय दुमदुमले. जीवनशैली स्वस्थ असेल तर आपण कॅन्सर सारख्या असाध्य आजारापासून स्वस्तः ला वाचवू शकतो असे उद्‌गार मातोश्री मंगल कार्यालय रोहा येथे डिवाइन संस्कार रिसर्च फाऊंडेशन द्वारा आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध स्त्रीरोग, कॅन्सर आणि गर्भ संस्कार तज्ञ बीके डॉ शुभदा नील यांनी केले. 
यावेळी त्यांनी गर्भाशय ग्रीवा आणि स्तन कर्करोग जनजागृतीवर मार्गदर्शन केले. डॉ. शुभदा नील यांचा रोहा ब्रह्मा कुमारिज तर्फे सत्कार करण्यात आला.स्वस्थ जीवनशैली साठी नियमित व्यायाम, सात्विक शाकाहारी भोजन, फळ भाज्या, गाढ झोप, ध्यान धारणा अंगिकारणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे नेहमी शांत, खुश, शक्तीशाली हलके राहिल्याने आपण निरोगी राहू शकतो.
गर्भाशय ग्रीवा कर्करोग ह्या आजरापासून बचाव करायचा असेल तर पॅप तपासणी, व्हाया तपासणी ह्या सारख्या तपासण्या २१ ते ६० वर्षाच्या महिलांनी करणे आवश्यक आहे. तसेच मुलींना व महिलांना लसीकरण करणे गरजेचे आहे.
स्तन कॅन्सरच्या बचावासाठी दर महिन्याला स्व स्तन परीक्षण,  वर्षांतून एकदा डॉक्टरांकडून तपासणी तसेच चाळीशीनंतर सोनोमॅमोग्राफी करणे गरजेचे आहे असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.
Comments