सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबईच्या वतीने पालकांना व त्यांच्या मुलांना १३० हेल्मेटचे वाटप...
पालकांना व त्यांच्या मुलांना १३० हेल्मेटचे वाटप...
पनवेल दि.२०(संजय कदम): सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबईच्या वतीने पालकांना आणि त्यांच्या मुलांना १३० हेल्मेटचे वाटप पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या कश्यप हॉलमध्ये  संपन्न झाले.
             सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई खूप साऱ्या प्रकल्पामध्ये काम करत आहे.ग्रामविकास , स्कूल किट, विद्यार्थी विकास शिष्यवृत्ती, बुक बँक ,फिरती विज्ञान  प्रयोगशाला , कम्यूनिटी नॉलेज हब  ,अभ्यासिका  आणि राईट टू सेफ्टी अश्या खूप साऱ्या  प्रकल्पावर त्यांच्या माध्यमातून काम सुरु आहे. त्यानुसार पनवेल तालुका  पोलिस स्टेशन मध्ये सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई यांच्या विद्यमाने आय सी आय सी आय लोंबार्ड यांच्यातर्फे पालकांना आणि त्यांच्या मुलांना 130 मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, सेवा सहयोग फाऊंडेशन चे प्रतिनिधी जयश्री सानप, माधवी पाटील, गणेश संसारे आणि सूरज शिंदे उपस्थित होते .या कार्यक्रमात  जयश्री सानप यांनी सेवा सहयोग फाऊंडेशन यामध्ये चालणाऱ्या प्रकल्पांबाबत माहिती दिली.
तसेच टू  व्हीलर चालवताना आपण हेल्मेट का वापरावे  आपली सुरक्षितता आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता कशी घ्यावी याबद्दल माहिती दिली ट्रॅफिक पोलिस आणि त्यांच्या मुलाला  ज्युनिअर रायडर हेल्मेट असे 2 हेल्मेट का  दिले याबद्दल खूप छान अशी माहिती दिली. दरम्यान आत्तापर्यंत पेण, रायगड,पालघर, नवी मुंबई, ठाणे ,मुंबई ,मुरबाड , अश्या बऱ्याच शाळांमध्ये मुलांना आणि त्यांच्या पालकांना 50000 हेल्मेटचे वाटप करण्यात आल्याची माहिती संस्थे कडून देण्यात आली.


फोटो: सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबईच्या वतीने हेल्मेटचे वाटप
Comments