आगामी रमजान ईद सणानिमित्त पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील मशिदीचे ट्रस्टी व मौलाना यांची घेण्यात आली बैठक...
मशिदीचे ट्रस्टी व मौलाना यांच्या सोबत बैठक...

पनवेल, दि.9 (संजय कदम) ः आगामी रमजान ईद सणानिमित्त पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील  मशिदीचे ट्रस्टी व मौलाना यांची बैठक पनवेल शहर पोलीस ठाण्यातील वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यालयात घेण्यात आली.    
या बैठकीत बैठकीत रमजान ईद सण हा शांततेत व सुरक्षित खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडावा. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याने आचारसंहितेचा अधिसूचनाचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी आदी संदर्भातील ार्गदर्शन वपोनि नितीन ठाकरे यांनी केले. सदर बैठकीला गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव यांच्यासह 20 मशिदी ट्रस्टचे 19 पदाधिकारी उपस्थित होते.फोटो ः बैठक
Comments