लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पनवेल शहरात पोलिसांचे रुट मार्च..
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पनवेल शहरात पोलिसांचे रुट मार्च


पनवेल वैभव / दि.29 (संजय कदम) ः  लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने वरीष्ठांच्या आदेशान्वये शहरातील विविध भागात रुट मार्च करण्यात आले.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे 01 एसआरपीएफ कंपनी प्राप्त झाली होती. सदर कंपनीचे 03 अधिकारी, 65 अंमलदार यांचा समावेश होता. त्यांच्यासह पोलीस ठाणे कडील 2 पोनि, 3 सपोनि/पोउपनि व 30 अंमलदार यांनी पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाची  मतदान केंद्रे, संवेदनशील परीसर, संमिश्र वस्ती तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची ठिकाणे त्यामध्ये प्रामुख्याने पोलीस ठाणे येथून सुरू, बावन्न बंगला, सुफा मज्जीत, मुसलमान नाका मोहल्ला, पटेल मोहल्ला, कोळीवाडा, उरण नाका पंचरत्न चौक, तक्का गाव, रेल्वे स्टेशन, शिवाजीनगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, व पनवेल एसटी डेपो येथे समाप्ती करण्यात  आली.


फोटो ः रुट मार्च
Comments