पनवेल, नवीन पनवेल मध्ये टोईंग व्हॅन पुन्हा सुरू..
पनवेल, नवीन पनवेल मध्ये टोईंग व्हॅन पुन्हा सुरू

पनवेल, / दि.4 (संजय कदम) ः गेल्या काही महिन्यापासून बंद असलेली टोईंग व्हॅन आता पुन्हा सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात पनवेल व नवीन पनवेल परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यास मदत होणार आहे.
गेल्या काही महिन्यापासून अचानकपणे पनवेल तसेच नवीन पनवेल भागातील वाहतूक शाखेची टोईंग व्हॅन सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे शिस्तीला लागलेले वाहन चालक पुन्हा बेशिस्त झाले होते व कोणीही कशाही पद्धतीने आपली वाहने रस्त्यावर उभी करत होती. याचा प्रामुख्याने सकाळी व संध्याकाळी नोकरी धंद्यानिमित्त घराबाहेर पडणार्‍या चाकरमान्यांना मोठा त्रास होत होता. या संदर्भात सोशल मिडीयाच्या माध्यमातून सुद्धा पुन्हा टोईंग व्हॅन सुरू करण्या संदर्भात मागणी करण्यात येत होती. याबाबत अनेकांनी संबंधित वाहतूक शाखेबरोबर पत्रव्यवहार करून पुन्हा शिस्त लावणारी टोईंग व्हॅन सुरू करा, अशी मागणी केली होती. या मागणीनुसार व आगामी सण, सुट्ट्या, निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा आजपासून टोईंग व्हॅन सेवा सुरू झाली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा बेशिस्त वाहन चालकांना शिस्तीचे धडे मिळणार आहेत. या टोईंग व्हॅनचे पनवेल व नवीन पनवेलकरांनी स्वागत केले आहे.


फोटो ः टोईंग व्हॅन (संग्रहीत)
Comments