पनवेल तालुका पोलिसांनी राबवले ऑल आउट ऑपरेशन...
पनवेल दि.२०(संजय कदम): लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवरती पनवेल तालुका पोलिसांनी राबवले हद्दीमध्ये ऑल आउट ऑपरेशन राबवून मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर आदींच्या उपस्थिती मध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी ऑल आउट ऑपरेशन राबवून त्यामध्ये प्रामुख्याने अंमली पदार्थ विरूद्ध कारवाई, अंमली पदार्थाचे सेवन करणारे 02 इसमांवर कारवाई, भारतीय हत्यार कायदा 4(25) प्रमाणे एक लोखंडी धारदार घातक शस्त्र जप्त केले, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(ई) अन्वये एकूण 09 गुन्हे दाखल करून देशी, विदेशी व हातभट्टी दारू (विनापरवाना विक्री) जप्त केली आहे, त्याचप्रमाणे कोपटा ॲक्ट अंतगर्त १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे बार वर कारवाई करून ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच हद्दीतील गुंड हिस्ट्रीशीटर यांची तपासणी,केली असता हिस्ट्रीशिटर 03 पैकी 03 मिळून आले त्याचप्रमाणे गुंडा रजिस्टर मधील 19 पैकी 10 मिळून आले आहेत तसेच प्रतिबंधक कारवाई सुद्धा करण्यात आल्या आहेत, त्याचप्रमाणे हद्दीकडे दोन ठिकाणी नाकाबंदी करून ३१ वाहनांवर मोटर वाहन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई मध्ये ७ सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, व ५७ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
फोटो: ऑल आउट ऑपरेशन