डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पनवेल तालुका पोलीस ठाण्यात घेण्यात आली बैठक..
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पनवेल तालुका पोलीस ठाण्यात घेण्यात आली बैठक

पनवेल, दि.11 (संजय कदम) ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आज पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे बैठक  घेण्यात आली.
सदर बैठकीत  वपोनि अनिल पाटील यांनी मार्गदर्शन करताना मिरवणुका, व इतर कार्यक्रम करताना कायदा व सुव्यवस्थेचा दृष्टीने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आयोजित मिरवणुका दिलेल्या मार्गाने वेळ व विहित वेळेत शांततेत पार पाडावे.  मिरवणुकीत महिला व पुरुष स्वतंत्र रांगा कराव्यात. मिरवणूक व इतर आयोजित कार्यक्रमात स्वयंसेवक नेमावे. लोकसभा निवडणूक - 2024 अनुषंगाने व कायदा व सुव्यवस्थेचा दृष्टीने योग्य त्या सूचना केल्या.  
सदर बैठकीस गोपनीय विभागाचे कुंवर यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते. सदर बैठक  शांततेत पार पडली.  




फोटो ः अनिल पाटील मार्गदर्शन करताना.
Comments