पनवेल येथील पटेल हॉस्पिटलमध्ये रोबोटद्वारे गुडघ्याच्या १०० शस्त्रक्रिया...
पटेल हॉस्पिटलमध्ये रोबोटद्वारे गुडघ्याच्या १०० शस्त्रक्रिया...




पनवेल वैभव वृत्तसेवा - : 
पनवेल शहरातील सुप्रसिद्ध पटेल हॉस्पिटलमध्ये रोबोट द्वारे गुडघ्याच्या शंभर शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. डॉ. कुणाल मखिजा यांनी रोबोटिक नी रिप्लेसमेंटच्या यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या असून त्यांनी आत्तापर्यंत 3000 हून अधिक गुडघ्याच्या शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. 
        पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील पहिली रोजा रोबोट पहिल्यांदा पटेल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आहे. ऑक्टोबर 2023 पासून आतापर्यंत १०० शस्त्रक्रिया पार पडले आहेत. मुंबई, नवी मुंबईमध्ये रोजा रोबोट फक्त दोन हॉस्पिटलमध्येच आहेत. गुडघेदुखीचा त्रास आजकाल सगळ्यांना होत आहे. हे आजकाल खूप लवकर दिसून येत आहे. पन्नास वर्षाच्या लोकांमध्ये पण गुडघेदुखी दिसून येतात. आजकाल गुडखेदुखीची शस्त्रक्रिया खूप कॉमन झाली आहे. आणि 40 वर्षाचा माणूस किंवा 90 वर्षाच्या माणसांमध्ये पण ही शस्त्रक्रिया केली जाते. पनवेल येथील पटेल हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया चाळीस वर्षाच्या महिलेमध्ये देखील केली आहे आणि 90 वर्षाच्या माणसांमध्ये देखील केली आहे. नुकतीच 130 किलो वजन असलेल्या महिलेवर या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.
    रोबोटिक नी रिप्लेसमेंटचा फायदा असा आहे की आपण जे सांधा नवीन बसवतो ते बसवताना जे परफेक्शन येतो ते खूप व्यवस्थित येतो. त्यात एक एम एम किंवा एक डिग्री सुद्धा प्रॉब्लेम येत नाही आणि त्यात स्नायू कमी कापले जातात. ऑपरेशनला वेळ देखील कमी लागतो. रक्त कमी जातो. हॉस्पिटलला कमी दिवस राहायला लागतो. इंजेक्शन कमी लागतात. हे सगळे फायदे पेशंटला होतात. त्याच्यामुळे तो लवकर आपल्या नॉर्मल आयुष्यमध्ये येतो. आणि परिवाराला आणि पेशंटला ऑपरेशनचा किंवा सर्जरीचा कमी त्रास होतो. जे नॉन रोबोटिक न्यू रिप्लेसमेंट करतात त्यात फिजिओथेरपी जास्त लागते आणि स्नायू कापायला जास्त लागतात. त्यामुळे रिकवरी थोडी स्लो होऊ शकते. 
आता रोबोटिकमुळे पेशंटची फिजिओथेरपी पण कमी लागते आणि रिकवरी पण फास्ट होते. रोबोटिक निरोप्लेसमेंटला पावर ऑफ थ्री म्हणतो ज्यात रोजा रोबोटिक्स प्रोफेशन सर्जनचा एक्सपिरीयन्स आणि गुडघ्यामध्ये जे सांधा टाकतो तो चांगल्या क्वालिटीचा टाकून पावर ऑफ थ्री चा पेशंटला फायदा देतो. त्याने पेशंटची रिकवरी खूप चांगली होते. पटेल हॉस्पिटलमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया करा किंवा नॉन रोबोटीक करा कोणत्याही माणसाकडून जास्त पैसे न घेता तेवढया पैशातच रोबोटीक न्यू रिप्लेसमेंट करून देत आहेत.
Comments