आगामी येणाऱ्या निवडणुका व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रिपब्लिकन चळवळीचे रायगड जिल्ह्याचे नेते महेश साळुंखे यांची कार्यकर्त्यांसोबत बैठक..
महेश साळुंखे यांची कार्यकर्त्यांसोबत बैठक

पनवेल दि.२६(वार्ताहर): आगामी येणाऱ्या निवडणुका आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रिपब्लिकन चळवळीचे  रायगड जिल्ह्याचे नेते महेश साळुंखे यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन त्यांची भूमिका जाणून घेतली. 
          रिपब्लिकन चळवळीचे  रायगड जिल्ह्याचे नेते महेश साळुंखे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक आगामी लोकसभेच्या निवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी घेतली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जे नेते आपल्या कार्यकर्त्यांना मान सन्मानाची वागणूक देतील व आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद , पंचायत समिती या निवडणुकांमध्ये योग्य ते उमेदवारीचा वाटा देतील अशाच पक्षाशी युती करण्याचा व त्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची भूमिका असून ती त्यांनी मान्य  केली आहे. त्याच बरोबर 14 एप्रिल 2024 रोजी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती विषयी कोणते कार्यक्रम आयोजित करायचे याविषयी चर्चा करण्यात आली.फोटो: महेश साळुंखे कार्यकर्ता बैठक
Comments