डॉ.नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत अभिनव पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा..
अभिनव पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा..

पनवेल वैभव वृत्तसेवा / दि. ०८ (वार्ताहर) : 
८ मार्च जागतिक महिला दिन सर्व जगभर महिलांचा सन्मान करून साजरा केला जातो. डॉ. नंदकुमार मारुती  जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत अभिनव पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केला गेला .पनवेल परिसरातील स्वतःचा व्यवसाय व कार्यक्षेत्रात आघाडीचे भूमिका निभवणाऱ्या, समाजातील उपेक्षित घटक म्हणून दुर्लक्षित गेलेल्या विशेष शाळेला मदत करणाऱ्या समाजसेविका, सेवाभावी संस्था, क्लबच्या अध्यक्षा, सामान्य शाळेतील मुख्याध्यापिका अशा 5 प्रतिभा संपन्न महिलांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
              यामध्ये सौ. अलका कोळी (स्किल डेव्हलपमेंट ऑफिसर रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर) , सौ.सई पालवणकर (रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन), श्रीमती.  मधु प्रजापती( समाजसेविका), सौ. मीना सजवान ( मुख्यध्यपिका सेंट मेरी स्कूल, सुकापुर), सौ. वंदना भारदवाज ( मुख्यध्यापिका सेंट जॉर्ज हायस्कूल ,आदई) या कर्तबगार महिलांचा त्यांच्या कार्यस्थळी जाऊन त्या करीत असलेल्या कार्यासाठी तसेंच विशेष शाळेसाठी करीत असलेल्या मदतीसाठी कृतज्ञतेच्या भावनेतून सत्कार करण्यात आला.
शाळेची विद्यार्थिनी कु. हिमानी भोइर, सौ. महानंदा निकम ,स्वाती माने, सौ .जयश्री वर्पे या शाळेच्या कर्मचारी यांनी डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचलित बौद्धिक अक्षम मुलांचा विषय शाळेतर्फे त्यांचा सत्कार केला. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना द्रुक श्राव्य माध्यमातून जागतिक महिला दिना बद्दल माहिती देण्यात आली. पनवेल परिसरातील कर्तबगार  महिलांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला त्याची क्षणचित्रे विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली.विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेली फुले व ग्रिटिंग शाळेच्या मुख्याध्यापिका, महिला शिक्षिका व कर्माचारी यांना देऊन त्यांचा गौरव केला व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.



फोटो : बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत अभिनव पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image