शिव आरोग्य सेनेचा कॅन्सर विरोधात लढा ; पनवेलमध्ये ९० महिलांवर मोफत उपचार
  पनवेलमध्ये ९० महिलांवर मोफत उपचार..

पनवेल / प्रतिनिधी : -
शिवआरोग्य सेना रायगड जिल्हा कार्यकारणीच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून खारघर मेडिकवर  हॉस्पिटल येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले
या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी ९० महिलावर मोफत उपचार करण्यात आले. शिबिराच्या निमित्ताने ब्रेस्ट कॅन्सर गर्भाशय, मुखाचा कॅन्सर या बाबत मार्गदर्शन करण्यात आले शिवआरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर, उपाध्यक्ष डॉ.जयवंत गाडे महाराष्ट्र राज्य समनव्यक जितेंद्र दगडूदादा सकपाळ यांच्या सूचनेनुसार शिवआरोग्य सेना पनवेल रायगड जिल्हा आणि खारघर मेडिकवर हॉस्पिटल येथे १०मार्च रोजी महिलांसाठी स्तन गर्भाशय मुखाचा कर्करोग याबाबत मोफत तपासणी शिबिर आयोजित केले होते.

यावेळी शिव आरोग्य सेना रायगड जिल्हाध्यक्ष डॉ.परेश देशमुख खारघर शहर संपर्क समन्वयक सचिन सावंत, कळंबोली शहर संघटक अस्मिता नाईक खारघर समन्वयक सचिव मीनल गरुड खांदा कॉलनी समन्वयक अर्चना शिरसागर यांचे सहकार्य लाभले . 
शिबीराला ९० महिलांवर उपचार करण्यात आले यावेळी शिवसेना पनवेल विधानसभा संघटक सुजाता कदम , रूपाली कवले , सानिका मोरे , उपशहर संघटक अस्मिता घाडगे, स्मिता धोडगे वैशाली पाटील हुस्ना खान आदी उपस्थित होते.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image