डॉ शुभदा नील यांचे गर्भाशय ग्रीवा / स्तनाचा कर्करोग तसेच डिवाईन गर्भसंस्कार या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन..
 गर्भसंस्कार या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन..
पनवेल / वैभव - : जागतिक महिला दिनानिमित्त ब्रह्माकुमारिज द्वारा आयोजित कार्यक्रमात बीके डॉ शुभदा नील यांनी गर्भाशय ग्रीवा / स्तनाचा कर्करोग तसेच डिवाईन गर्भसंस्कार या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले.
     प्रसिद्ध स्त्रीरोग, कॅन्सर आणि गर्भ संस्कार तज्ञ बीके डॉ. शुभदा नील यांनी दिव्य गर्भ संस्कार सुपर मॉम बेबी प्रोजेक्टवर गर्भवती महीला व नातेवाईक यांना संबोधित केले. डॉ. शुभदा नील म्हणाल्या, गरोदर माता आनंदी आणि निरोगी असेल तर बाळही आनंदी आणि निरोगी राहील. तसेच गरोदर महिलांना आहार, व्यायाम, प्राणायाम, ध्यानधारणा, नॉर्मल प्रसूती व इतर विषयांवर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. गर्भसंस्कार बालकाला सुसंस्कृत, ज्ञानी, सर्व गुणांनी संपन्न, बलवान, चारित्र्यवान आणि हुशार बनण्यास मदत करतात. अशा हुशार, सुसंस्कृत मुलांमुळे प्रत्येक घर स्वर्ग बनेल, ज्याद्वारे भारत पुन्हा एकदा जगतगुरु बनेल, ह्या पृथ्वी वर रामराज्य स्थापन होऊन पुन्हा एकदा ही धरा स्वर्ग बनेल. 
         तसेच त्यांनी गर्भाशय ग्रीवा / स्तनाचा कर्करोग या विषयांवर सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. गर्भाशय ग्रीवा कर्करोग ह्या आजरापासून बचाव करायचा असेल तर पॅप तपासणी, व्हाया तपासणी ह्या सारख्या तपासण्या २१ ते ६० वर्षाच्या महिलांनी करणे आवश्यक आहे. तसेच मुलींना व महिलांना लसीकरण करणे गरजेचे आहे. स्तन कॅन्सरच्या बचावासाठी दर महिन्याला स्व स्तन परीक्षण,  वर्षांतून एकदा डॉक्टरांकडून तपासणी तसेच चाळीशीनंतर सोनोमॅमोग्राफी करणे गरजेचे आहे.
Comments