राष्ट्रीय लोक अदालतीत १३८२ प्रकरणे निकाली..
राष्ट्रीय लोक अदालतीत १३८२ प्रकरणे निकाली..

पनवेल वैभव / दि. ०६ (संजय कदम): दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या दि. ३ मार्च २०२४ रोजी पनवेल येथील न्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व आणि  दाखल असलेली अशी  एकूण १३८२ प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आले आहे. अशी माहिती अध्यक्ष,तालुका विधी सेवा समिती, पनवेल तथा जिल्हा न्यायाधीश जयराज वडणे यांनी दिली.
            राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे तसेच न्यायालयात बँका आणि फायनान्स कंपन्या तसेच एम एस ई बी, एम टी एन एल, विभागाकडील तसेच पोलीस प्रशासाना कडील वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. पनवेल येथील न्यायालयात आयोजित केल्या गेलेल्या लोक अदालतीमध्ये वादपुर्व  व प्रलंबित अशी एकूण 15385  प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 10695 वादपूर्व प्रकरणापेकी 812 आणि 4690 प्रलंबित खटल्यांपैकी 570 अशी एकूण 1382  प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आली. व त्याद्वारे पक्षकारांना एकूण 4 कोटी 39 लाख  36 हजार 18 रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे. 
पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ आणि संपूर्ण कार्यकारणी मंडळ यांचे विशेष सहकार्य मिळाले. पनवेल येथील न्यायालयात ६ लोकअदालतीचे कक्ष यात एस. आर. चव्हाण - जिल्हा न्यायाधीश 4 व सह सत्र न्यायाधीश पनवेल, श्रीमती ए. ए. गोडसे. तिसरे सह दिवाणी न्यायाधीश व स्तर पनवेल, श्रीमती एन. पी. पवार , सह दिवाणी न्यायाधीश, व स्तर, पनवेल,  एन. आर. इंदलकर सह दिवाणी न्यायाधीश क स्तर पनवेल , श्रीमती एन. आर. पाटील दुसरे सह दिवाणी न्यायाधीश पनवेल, आणि एम. डी. सैंदाणे तिसरे सह दिवाणी न्यायाधीश पनवेल स्थापन करण्यात आले होते. यात ॲड. मनीषा गावंडे , ॲड. स्वाती सोनवणे , ॲड. मनीषा गायकर , ॲड. पूर्णिमा सुतार , ॲड. एच. के. मिरगुंडे आणि ॲड. समिना खान यांनी पंच म्हणून काम पाहिले. लोक अदालती मध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून देखील प्रकरणे मिटवण्यात आली.या लोकन्यायालयाला यशस्वी करण्यासाठी अधीक्षक - जिल्हा न्यायालय -  एस आर चाचे, वरिष्ठ लिपिक श्रीमती. सुजाता महाडिक, लिपिक अविनाश चंदने, विधी स्वयंसेवक शैलेश कोंडसकर, सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग , महानगरपालिका, बँक, पोलीस प्रशासन, आणि सर्व पक्षकार यांनी भरगोस असा प्रतिसाद दिला. तालुका विधी सेवा समिती पनवेल यांच्यावतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.




फोटो: राष्ट्रीय लोक अदालत
Comments