नांदगाव येथे गाडीला लागली आग ....
पनवेल, दि.25 (संजय कदम) : एका चारचाकी गाडीला पनवेल तालुक्यातील नांदगाव जवळ आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रमेश गामी (42, रा.ठाणे) हे परिवारासह आपल्या ताब्यातील निसान तेरेना गाडी क्रमांक एमएच 46 एएल 7220 ही गाडी जेएनपीटी बाजूकडून पळस्पे बाजूकडे जात असताना पनवेल तालुक्यातील नांदगाव जवळ त्यांच्या गाडीने अचानक पेट घेतला. सदर गाडीला आग लागल्याची माहिती समजताच पोहवा योगेश भोईर, प्रशांत भोईर, पोना संदीप पाटील, भुंडेरे, ढेंबरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पनवेल महापालिका अग्निशमन दल आणि नवीन पनवेल अग्निशमन दलाला पाचारण करून सदरची आग आटोक्यात आणली. यात कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.