जागतिक महिलादिनानिमित्त ऍड मनोज भुजबळ व उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ तर्फे लहान मुला मुलींना व महिलांना मोफत लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर..
         मोफत लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर ..

पनवेल वैभव दि. ०४ ( वार्ताहर ) :  जागतिक महिला दिनाच्या निमित्त एडवोकेट मनोज भुजबळ व उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ यांस कडून लहान मुला मुलींना व महिलांना मोफत लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर दोन मार्च 2024 ते 8 मार्च 2024 पर्यंत सुरू केले आहे. 
                   तरी 2 मार्च 2024 रोजी संध्याकाळी सेक्टर 16 गार्डन येथे एडवोकेट मनोज भुजबळ तसेच एडवोकेट प्रीती भुजबळ यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी उत्कर्ष संस्कृत कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राकेश भुजबळ नितीन भुजबळ किशोर शिंदे क्रांती कुमार चितले अजित लोंढे चंद्रकांत पट्टेबहादूर गुरव साहेब नरेंद्र साहेब तसेच महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी लहान मुला मुली ंपासून ते वृद्ध महिलांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला.
फोटो - लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर
Comments