जागतिक महिला दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन ; पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
         पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

पनवेल दि.११(संजय कदम) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून   रोट्रॅक्ट क्लब ऑफ पनवेल इलाईट, आम्ही रक्तदाते पनवेलचे, श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट, पुज्य सिंधी पंचायत ट्रस्ट आणि दिलासा फाऊंडेशन यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला 
          शहरातील पूज्य सिंधी पंचायत हॉल मध्ये थेंब आहे रक्ताचा, आधार दुसऱ्याच्या जीवनाचा या शीर्षकाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला अनेक मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे तरुण वर्गाने उपस्थित राहून रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात ५० जणांनी रक्तदान केले. त्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन आयोजकांतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. हे रक्तदान शिबीर एमजीएम हॉस्पिटल कामोठे यांच्या माध्यमातून संपन्न झाले. 



फोटो: जागतिक महिला दीना निमित्त आयोजित रक्तदान शिबीर
Comments
Popular posts
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image