जुईली रविंद्र घरत व प्रणित रोहिदास वास्कर यांचा शानदार पद्धतीने साखरपुडा समारंभ संपन्न ; अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या राज रिसॉर्ट येथे वधू-वरांच्या आप्तेष्टांचा परिचय सोहळा रंगला...
अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या राज रिसॉर्ट येथे वधू-वरांच्या आप्तेष्टांचा परिचय सोहळा रंगला...


पनवेल दि.२१(वार्ताहर):  ओ.एन.जी.सी.कॉलनी समोरील सुप्रसिद्ध गोविंदा हॉटेल चे प्रोप्रायटर श्री रविंद्र गंगाराम घरत व सौ.जयश्री रवींद्र घरत यांची सुस्वरूप कन्या जुईली आणि  रोहिदास बाबू वास्कर व सौ.प्रभावती रोहिदास वास्कर यांचे चिरंजीव प्रणित यांचा उसर्लि (बुद्रुक) येथील राज रिसॉर्ट येथे साखरपुडा समारंभ मोठ्या शानदार सोहळ्यामध्ये संपन्न झाला. वागदत्त वधू वरांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी शेकडो आप्तेष्ट उपस्थित होते. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या राज रिसॉर्ट येथे भव्य दिव्य आणि नेत्र दीपक रोषणाई मध्ये वधू-वरांच्या आप्तेष्टांचा परिचय सोहळा रंगला.
            आप्तेष्टांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी, हॉटेल व्यावसायिक,ओ एन जी सी चे अधिकारी,पोलीस अधिकारी,न्याय व विधी क्षेत्रातील तज्ज्ञ, डॉक्टर्स,प्रशासकीय अधिकारी असे समाजाच्या विविध स्तरावरील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत वागदत्त वधूवरांना आशीर्वाद दिले. आपल्या संस्कृतीत वधू आणि वराच्या सहजीवनाची गाठ बांधून, अग्नी साक्षी ठेवत सात पावले चालून विवाह करण्याची रीत आहे.तत्पूर्वी दोन्हीकडच्या आप्तेष्टांचा वधू-वरांशी आणि त्यांच्या नातेवाईकांची परिचय व्हावा या उदात्त हेतून साजरा केला जाणारा समारंभ म्हणजे साखरपुडा.मोजके धार्मिक विधी,ओटी भरणे,अंगठ्या अथवा भेट वस्तूंची देवाणघेवाण करणे यासोबतच दोन्ही कुटुंबांची एकमेकांशी ओळख आणि विवाहाची पूर्वतयारी या दृष्टीने या सोहळ्यास अनन्यसाधारण महत्त्व असते. जुईली आणि प्रणित यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने घरत आणि वास्कर कुटुंबीय व आप्तेष्टांच्या परिवाराने साखरपुड्याचा आनंद लुटला. हा साखरपुडा ज्या नेत्रदीपक रिसॉर्ट वरती संपन्न झाला ते राज रिसॉर्ट हे खरे तर डेस्टिनेशन वेडिंग साठी अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या उसर्ली ( बुद्रुक) येथील हवेशीर आणि मोकळे वातावरण.प्रशस्त आणि हिरवेगार लॉन,भव्य रूम्स,स्विमिंग पूल,मुबलक पार्किंग,अप्रतिम लॉजिंग, रूफ टॉप रेस्टॉरंट, लिफ्ट, तत्पर रूम सर्विस या गुणवैशिष्ट्यामुळे हे रिसॉर्ट लोकांची पहिली पसंती बनत आहे. रिसॉर्ट ओनर माजी नरसेवक संतोष उरणकर यांनी चोखंदळ कलाकारांकडून बनवून घेतलेली पेंटिंग्स, सर्वोत्तम दर्जाचे फर्निचर, स्वच्छता यामुळे येथील रूम्स मध्ये वास्तव्य करण्याचा एक अनोखा अनुभव ग्राहकांना प्राप्त होतो.तसेच त्यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे प्रत्येक सोहळा निर्विघ्नपणे आणि चिरकाल स्मरणात राहील या दर्जाचा साजरा होतो. या साऱ्याची प्रचिती
जुईली आणि प्रणित यांच्या साखरपुड्याच्या सोहळ्यात उपस्थितांना आली.फोटो: परिचय सोहळा
Comments