नैना क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश 



पनवेल (प्रतिनिधी) नैना अंतर्गत येणाऱ्या अनेक ग्रामपंचायत हद्दीतील मोडकळीस आलेल्या शेकडो इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे, त्या अनुषंगाने या संदर्भात शासनाने नुकताच शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी आणि त्यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. 
         नैना क्षेत्रातील सुकापूर, पालीदेवद, कोळखे व आजूबाजूच्या परिसरातील गावामधील अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. मात्र या ठिकाणी या इमारतींचा पुनर्विकास नैना संदर्भातील नियमामुळे होत नव्हता. त्यामुळे या मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये सदनिका धारकांना भयभीत रहावे लागत होते. काही अपघातही या मोडकळीस आलेल्या इमार्तीमंध्ये झाले आहेत. त्यामुळे हा प्रश्न गंभीर असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने शासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करतानाच या महत्वपूर्ण समस्यांवर शासनाचे लक्ष केंद्रित केले तसेच नगरविकास खात्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने रायगडचे पालकमंत्री उदय सामंत व अधिकाऱ्यांसमवेत समवेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या बैठका झाल्या. आणि त्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे त्यांना आश्वासित केले होते. त्यानुसार विशेष नियोजन प्राधिकरणाने(सिडको) युडीसीपीआरमध्ये फेरबदल करण्याच्या सादर केलेल्या प्रस्तावास शासनाने १५ मार्च २०२४ रोजी मंजूरी दिली आहे. त्याप्रमाणे जुन्या मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे आणि हा फेरबदल तात्काळ लागू करण्याचे निर्देशही त्यात देण्यात आले आहे. त्यानुसार ३० दिवसाच्या कालावधीत आम नागरिकांकडून हरकती किंवा सूचना मागवण्यात आल्या आहेत. यासाठी शासनातर्फे कोकण विभाग नगर रचना सहसंचालक यांची अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे गेली अनेक वर्षे प्रतिक्षेत असलेल्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग सुकर झाला आहे. आणि त्या अनुषंगाने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कमी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेला पाठपुरावा महत्वाचा ठरला. सदरचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शासनाचे आभार मानले आहेत. 

कोट-
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सतत काम करत असतात. विकासाच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर ते आहेतच पण लोकांच्या प्रश्नांची जाण त्यांना आहे.  नैना क्षेत्रातील नागरिकांना प्रथम न्याय देण्याची आग्रही भूमिका आमदार प्रशांत ठाकूर यांनी कायम शासनाकडे मांडली. धोकादायक मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न गंभीर होता, तो प्रश्न मार्गी लावण्यात आमदार प्रश्नात ठाकूर यांनी केलेला पाठपुरावा मोलाचा ठरला आहे. त्याबद्दल मी नागरिकांच्यावतीने आभार व्यक्त करतो. - अमित जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image