लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचार संहिता भंग कारवाई भरारी पथक..
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचार संहिता भंग कारवाई भरारी पथक..


पनवेल दि.२०(संजय कदम): आगामी लोकसभा  निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या नियम व अटींचा भंग करणाऱ्या व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष यांच्या विरोधात त्वरित कारवाई करण्याच्या उद्देशाने आचार संहिता भंग कारवाई भरारी पथकाची नेमणूक पनवेल तालुक्यात करण्यात आली आहे. 
             पनवेल तालुक्यात अश्या प्रकारची ६ भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून त्यामध्ये शासकीय  अधिकारी, पोलीस कर्मचारी व १ कॅमेरामन यांच्या दिमतीला एक शासकीय गाडी सोबत राहणार आहे. या संदर्भात तक्रार किंवा माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगाने एक अँप घोषित केले असून या अँप वर तक्रार दाखल करताच हे भरारी पथक त्वरित त्या ठिकाणी जाऊन संबंधित माहितीची शहानिशा करून कारवाई करणार आहे. ती पथके सकाळी व तीन पथके रात्री अशी २४ तास ही पथके उपलब्ध राहणार आहेत. व ते आचार संहिता भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करणार आहेत.
Comments