पेझारी हौशी बैलगाडी मित्र मंडळा तर्फे बैलगाडी शर्यतीचे भव्य दिव्य आयोजन...
पेझारी दिवलांग गावचे चंद्रकांत शंकर धुमाळ (गुरुजी)यांच्या बैलगाडीने पटकावला प्रथम क्रमांक..पनवेल / वार्ताहर :- 
पेझारी हौशी बैलगाडी मित्र मंडळ आयोजित भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचे पेझारी माती बंदर येथे दि. १७ मार्च २०२४ रोजी रविवार बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. 
या स्पर्धेमध्ये ८० बैलगाडीने भाग घेतला होता. सदर बैलगाडी स्पर्धेचे उद्घाटन महिला आघाडी प्रमुख (शे.का.प.) चित्रलेखा पाटील तसेच मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष अँड.आस्वाद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या बैलगाडी शर्यतीत फायनल गटामध्ये पेझारी दिवलांगचे गावचे चंद्रकांत शंकर धुमाळ (गुरुजी) यांची बैलगाडी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरली तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी नागझरी बांधण चे महेंद्र साळवी आणि तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी कामार्ली वाघोली चे ऋषिकेश नागांवकर हे विजयी ठरले यावेळी हजारो प्रेक्षकांनी उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवली .

Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र राज्य महामंडळातील संचित तोटा संदर्भात चौकशी करणेबाबत महामाहीम राष्ट्रपतींना निवेदन..
Image
'कमवा आणि शिका' उद्दिष्टाने कमवले “बार काउन्सिल ऑफ़ इंडिया” चे सदस्यत्व आणि 'मास्टर ऑफ लॉ' पदवी ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन व कौतुक
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image
शिवबंधन बांधून शेकडो महिलांनी केला शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश...
Image