भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या संस्थापक आणि अध्यक्ष स्वप्नाली कदम यांच्या कार्याचा सत्कार ; खारघर येथील मेडिकवर हॉस्पीटलचा उपक्रम..
खारघर येथील मेडिकवर हॉस्पीटलचा उपक्रम
 
पनवेल दि १७ (संजय कदम) : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने मेडीकवर हॉस्पिटल्स खारघर यांनी समाजात उत्तम कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सत्कार केला. स्वप्नाली कदम(भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या अध्यक्ष) यांना याठिकाणी गौरविण्यात आले.
                 दीपाली पाटील (पीआय,खारघर), कु.स्नेहा पाटील (पीएसआय, खारघर), कु.मीरा सुरेश(ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्या) श्रीमती लीना गरड( फोरम,खारघर) स्वाती पांडुरंग नाईक(पत्रकार, झी न्यूज) आदी महिलांच्या कार्याचा या ठिकाणी सम्मान करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान त्यांना स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील माझ्या योगदानाबद्दल मला याठिकाणी सन्मानित करण्यात आले. हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. माझ्या या प्रवासात मला सहकार्य करणाऱ्या सर्वच महिलांचा हा सत्कार आहे. याठिकाणी महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. आज विविध क्षेत्रात महिला आपली एक नवी ओळख निर्माण करत असून या स्त्रीशक्ती कार्याची दखल घेतल्याबद्दल आणि त्यांना सन्मानित केल्याबद्दल मेडिकवर हॉस्पीटलचे खरोखरच कौतुक वाटत अशी प्रतिक्रिया सौ स्वप्नाली कदम (भारती विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या संस्थापक आणि कोवीच्या अध्यक्ष) यांनी व्यक्त केली. सर्वच क्षेत्रात महिलांनी बजाविलेल्या उल्लेखनीय कामगिरीची ओळख करून देणारा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. या सर्वच महिलांचे कार्य आणि त्यांचा इथपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमाच्या  माध्यमातून  गौरविण्यात आलेल्या महिलांचे कार्य खरोखरच वाखण्याजोगे असल्याची प्रतिक्रिया डॉ. माताप्रसाद गुप्ता (मेडिकवर हॉस्पिटल्सचे केंद्र प्रमुख) यांनी व्यक्त केली.फोटो - सत्कार
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image