पनवेलमध्ये शनिवारी 'नमो चषक' महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा ....
पनवेलमध्ये शनिवारी 'नमो चषक' महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा ....
पनवेल (प्रतिनिधी) देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात 'नमो चषक' स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  त्या अनुषंगाने पनवेल विधानसभा मतदार संघात पार पडलेल्या नमो चषक २०२४ स्पर्धत ०१ लाख १३हजार २७८ स्पर्धकांनी सहभाग घेऊन महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकाविला आहे. या महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक ०२ मार्च रोजी दुपारी ०३ वाजता पनवेल मधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 
          यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास क्रीडापटू व क्रीडा रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी सभागृहनेते परेश ठाकूर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, जिल्हा सरचिटणीस अभिषेक भोपी, दिनेश खानावकर, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, कामोठे अध्यक्ष तेजस जाधव, खारघर अध्यक्ष नितेश पाटील, कळंबोली अध्यक्ष गौरव नाईक यांनी केले आहे. 
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image