उबाठा गटाच्या पनवेल उरण मधील महिलांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश
पनवेल / वार्ताहर :- 
मावळचे संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या कार्यप्रणालीने प्रेरित होऊन शिवसेना पनवेल महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वात उबाठा गटाच्या पनवेल-उरणच्या महिला तालुका संघटिका सौ.मेघा दमडे, दापोलीच्या सरपंच सौ.समता गोसावी, शाखाप्रमुख सौ.मोनिका जितेकर, शाखा संघटिक सौ.रुचिता म्हात्रे यांसह पनवेल उरण मधील अनेक महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हातात भगवा झेंडा देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राज्यात महिला सशक्तीकरण अभियान राबवत असून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गरत बचत गटांना 'शक्ती गटात' रूपांतरित करून त्यांच्या उत्पादनांचे ब्रँडिंग, मार्केटिंग करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. 
यावेळी शिवसेना पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांच्यासह पनवेल तालुका संघटिका मंदा जंगले, संध्या पाटील, तळोजा विभाग प्रमुख प्रकाश म्हात्रे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image