खांदेश्‍वर पोलिसांनी अवघ्या २४ तासात घरफोडी आणली उघडकीस ; २ जण ताब्यात
खांदेश्‍वर पोलिसांनी अवघ्या 24 तासात घरफोडी आणली उघडकीस ; 2 जण ताब्यात...पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः  पनवेल तालुक्यातील विचुंबे गावाच्या हद्दीत झालेली घरफोडी खांदेश्‍वर पोलिसांनी तक्रार दाखल होताच अवघ्या 24 तासात ही घरफोडी उघडकीस आणली असून 100% मालमत्ता हस्तगत केली आहे.
विचुंबे येथील एका घरात घरफोडी झाली होती. याबाबतची तक्रार खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलीस उप आयुक्त परि 02, विवेक पानसरे, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग अशोक राजपुत, यांच्या मार्गदर्शनाखाली व.पो.नि. चंद्रकांत लांडगे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि समीर चासकर, पो ह महेश कांबळे, वैशाली पाटील, धिरेंद्र पाटील, उदय देसाई, पोशि सचिन पवार आदींच्या पथकाने सदर गुन्ह्याचा सीसीटीव्ही व तांत्रिक विश्‍लेषण करून घरफोडी मधील 11 तोळे वजनाचे रू 4,50,000/- सोन्याचे दागिने अशी 100% मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. व याप्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अवघ्या 24 तासात ही घरफोडी उघडकीस आणल्याबद्दल खांदेश्‍वर पोलिसांंचे कौतुक करण्यात येत आहे.
Comments