कामोठे वसाहतीमधील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसह तरुणांचा शेेकापक्षात प्रवेश...
कार्यकर्त्यांसह तरुणांनी केला शेेकापक्षात प्रवेश..


पनवेल, दि.20 (संजय कदम) ः शेतकरी कामगार पक्षाचे मा. आ. बाळाराम पाटील यांच्या विचाराने प्रेरित होऊन आणि कामोठे शहर कार्याध्यक्ष गौरव भाई पोरवाल यांच्या नृतत्वखाली आज कामोठे वसाहतीमधील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसह तरुणांनी शेकापक्षात जाहीर प्रवेश केला.
त्यामध्ये प्रामुख्याने तरुण नेतृत्व, सामजिक क्षेत्रात सहकार्य असणारे रत्नाकर वायदंडे यांच्यासह अनेक तरुणांनी माजी सभापती सखाराम पाटील, शहर संघटक अल्पेश माने, रमेश गोरे, नितीन पगारे, नाना भगत, नाना मुळिक, मलेश भट्ट, मंगेश चिमन आदींच्या उपस्थितीत पक्ष प्र्रवेश केला. पक्षात प्रवेश करणार्‍या तरुणांन योग्य न्याय दिला जाईल, असे आश्‍वासन यावेळी शहर कार्याध्यक्ष गौरवभाई पोरवाल यांनी दिले आहे.फोटो ः पक्षप्रवेश
Comments