फेअरनेस क्रीममधील विषारी घटकांमुळे रायगडच्या दोन रुग्णांना जडला किडनी विकार..

तज्ञांच्या परवानगीशिवाय आणि सुरक्षिततेची खात्री न करता कोणतीही उत्पादन न वापरण्याचा तज्ज्ञांचा सल्ला...

नवी मुंबई / वार्ताहर - : त्वचेचा रंग उजळ करण्यासारख्या खोट्या आश्वासनांना बळी पडून  रायगडमधील दोन रुग्णांनी निकृष्ट दर्जाचे हर्बल फेअरनेस क्रीम वापरण्यास सुरुवात केली. हे फेअरनेस क्रीम वापरल्यानंतर, त्यांच्या त्वचेचा रंग उजळण्याऐवजी त्यातील विषारी घटकांमुळे किडनीचा आजार झाला. दोन्ही रूग्णांनी नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल्स नेफ्रोलॉजी आणि  किडनी ट्रान्सप्लांट विभागाचे प्रमुख डॉ अमित लंगोटे यांच्याकडे धाव घेतली. 

बरेच रुग्ण त्वचेचा रंग उजळविण्यासाठी आणि त्वचेचा पोत सुधारण्यासाठी फेअरनेस क्रीम्सचा वापर करतात. अशा उत्पादनांच्या हानिकारक प्रभावांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. याठिकाणी या दोन्ही रुग्णांना विषारी घटकांचा समावेश असलेल्या फेअरनेस क्रीम्सच्या वापराने मूत्रपिंडाचे संबंधीत समस्यांना सामोरे जावे लागले. रायगड येथील या दोन्ही रुग्णांना पारा सारख्या हानिकारक घटकांनीयुक्त अशा फेअरनेस क्रीम्स वापरण्याचा फटका सहन करावा लागला.

24 वर्षीय श्रीमती नमिता शिंदे (नाव बदलले आहे)* ही रुग्ण 8 महिन्यांहून अधिक काळ स्थानिक डॉक्टरांनी लिहून दिलेली हर्बल फेअरनेस क्रीम वापरत होती. तर, 56 वर्षीय श्री रमेश मोरे (नाव बदलले आहे)* हे देखील 3-4 महिन्यांपासून नाव्ह्याने लिहून दिलेले हर्बल फेअरनेस क्रीम वापरत होते. दोन्ही क्रीमच्या लेबलवर हर्बल घटकांचा उल्लेख करण्यात आला होता. सुरुवातीला या दोघांना शरीरावर सूज आली आणि त्यांनी पुढील वैद्यकीय उपचाराकरिता नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल्स येथे धाव घेतली.

नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल्स येथील नेफ्रोलॉजी विभाग आणि किडनी प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ अमित लंगोटे सांगतात की, सुरुवातीला रुग्णांच्या शरीरावर सूज आणि लघवीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आढळून आली. त्वचा उजळणाऱ्या क्रीममध्ये आढळणारे विषारी घटक आणि धातूंमुळे त्यांच्या किडनी बायोप्सीमध्ये मेमब्रेनस नेफ्रोपॅथीचे निदान झाले ज्यात NELL-1 ॲंटीजन ( कर्करोग किंवा हेवी मेटल संबंधीत असते ) आडळून आले. पुरुष रुग्णाची सुरुवातीला कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली होती आणि पुढील तपासणीनंतर, त्याने सांगितले की त्याच्या नाव्ह्याने त्यांना स्किन-लाइटनिंग क्रीम दिले होते जे त्याने 5 महिने वापरले होते. पुढील तपासणीत त्याच्या रक्तातील पारा(मर्क्युरी) वाढल्याचे आढळून आले. या शोधानंतर, रुग्णाला औषधे लिहून देण्यात आली ज्यामुळे त्याच्या मूत्रातील प्रथिनांची पातळी कमी झाली आणि त्याच्या मूत्रपिंडाच्या स्थितीत सुधारणा झाली.

डॉ. लंगोटे पुढे सांगतात की, महिला रुग्णाची NELL-1 ॲंटीजन चाचणी सकारात्मक आली आणि तिने दिलेल्या माहितीनुसार ती तिच्या स्थानिक डॉक्टरांनी लिहून दिलेले विदेशी फेअरनेस क्रीम वापरत असल्याचे सांगितले ज्यामुळे तिच्या रक्तातील पारा (मर्क्युरी) वाढला. रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. या रुग्णांना वेळीच उपचार मिळाल्याने भविष्यातील गुंतागुंत टाळता आली.  बरेच लोक एफडीए-मान्यता नसलेली फेअरनेस क्रीम वापरतात. या क्रीममधील उच्च पारा (मर्क्युरी) त्वचेच्या रंगद्रव्यासाठी जबाबदार असलेल्या त्वचेतील मेलेनोसाइट्स वर परिणाम करते. होम बेस क्रिम्समध्ये ( न्हावी किंवा सलून जे क्रीम विकतात) अनेकदा पाऱ्याचा (मर्क्युरी)  वापर करतात. ही फेअरनेस उत्पादने वापरल्याने किडनीचे आरोग्य आणि एकूणच आरोग्य धोक्यात येते. ग्राहकांनी अशी उत्पादने खरेदी करणे टाळावे योग्य तज्ञांच्या परवानगीशिवाय आणि सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (FDA) मान्यताप्राप्त क्रीम्सची निवड करा. यापैकी बहुतेक क्रीम्स त्यांच्यामध्ये लपलेले विषारी धातू/पारा (मर्क्युरी)  दर्शवत नाहीत. खरं तर हे लेबले केवळ वनस्पती-आधारित घटक दर्शवितात जे ग्राहकांना ते सुरक्षित वाटतात आणि म्हणून त्यांचा वापर केला जातो. कोणत्याही प्रकारची उत्पादने वापरण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यांचे दुष्परिणाम जाणून घ्यावेत.

दोन्ही रुग्णांनी त्वरित निदान आणि वेळीच उपचार केल्याने भविष्यातील गुंतागुंत टाळता आली. या रुग्णांनी मेडीकवर हॉस्पिटल चे आभार मानले. डॉ अमित लंगोटे आणि त्यांच्या टीमने रुग्णाचा जीव वाचवत कॉस्मेटिक उत्पादनांवरील कठोर नियमावली च्या आवश्यकतेवर प्रकाश टाकला. आरोग्यास हानिकारक उत्पादन न वापरता नैसर्गीकरित्या मिळालेला त्वचेचा रंग स्वीकारणे गरजेचे आहे असेही रुग्ण श्रीमती नमिता शिंदे (नाव बदलले आहे)* यांनी स्पष्ट केले.
Comments