शिवशक्ती मित्र मंडळाच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका प्रबोधनकार ठाकरे मार्ग फलकाचे अनावरण...
प्रबोधनकार ठाकरे मार्ग फलकाचे अनावरण... 

पनवेल दि.२६ (वार्ताहर) : पनवेल शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शिवशक्ती मित्र मंडळाच्या माध्यमातून व यासाठी पनवेल महानगरपालिकडे सातत्याने पाठपुरावा करणारे मा. नगरसेवक व शिवशक्ती मित्र मंडळाचे संस्थापक रमेश गुडेकर यांच्या प्रयत्नांमुळे उभारण्यात आलेल्या पनवेल महानगरपालिका प्रबोधनकार ठाकरे मार्ग फलकाचे अनावरण शिवसेना मा.जिल्हाप्रमुख माधवराव भिडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या  कामासाठी  मा. नगरसेवक राजू सोनी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
           यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक मा.जिल्हा प्रमुख माधवराव भिडे, मा. नगरसेवक रमेश गुडेकर, मंडळाचे अध्यक्ष गौरव वेदक, उपाध्यक्ष संजय पाटील व इतर सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना माधवराब भिडे यांनी सांगिलते की, या फलकाचे अनावरण माझ्या हस्ते करण्यात येत आहे हे मी माझे भाग्य समजतो.  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून रायगड जिल्ह्यात व पनवेल तालुक्यात पक्ष वाढीसाठी काम केले आहे.  त्यामुळे आज जिल्ह्यात शिवसेनेची एक मोठी ताकद व फळी उभी राहिली आहे. तर मा. नगरसेवक रमेश गुडेकर म्हणाले की, पनवेल महानगरपालिकेकडे पाठपुरावाद यासाठी बजेट मध्ये पनवेल नगरपरिषदेच्या मा.नगराध्यक्ष चारुशीला घरत यांच्याकडे मा. बाळासाहेब ठाकरे यांचे सुन्दर स्मारक व्हावे यासाठी १ कोटींची तरतूद त्यावेळी करून ठेवली आहे. तसेच शहरातील महापुरुषांच्या भव्य कमानी व त्यांचे नाव रस्त्यांना देण्यात यावे साठी पाठपुरावा केला होता. त्यामुळेच ४ ठिकाणी या कमानी मंजूर करण्याचे आश्वासन त्यावेळी दिले होते. आज या फलकाचे अनावरण करताना अत्यानंद होत असल्याचे सांगिलते फोटो: नाम फलक अनावरण
Comments