रेल्वे स्टेशन परिसरात लुटमारीसह चोऱ्या करणारा सराईत गुन्हेगार गजाआड...
रेल्वे स्टेशन परिसरात लुटमारीसह चोऱ्या करणारा सराईत गुन्हेगार गजाआड...पनवेल दि.०२ (संजय कदम) : पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात गल्लीबोळात काळोखातून जाणाऱ्या प्रवाशांना अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल फोनसह रोख रक्कम लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गेल्या काही दिवसापासून पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात मोबाईल चोरीच्या व लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे आरोपीचा शोध घेत असताना त्याच भागात राहणारा सराईत गुन्हेगार शकील मोहम्मद शेख याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याचा ताबा घेतला असता त्याने आतापर्यंत १० मोबाईल फोन लुटल्याचे कबुल केले. त्याला ताब्यात घेतल्यामुळे पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
Comments