बांधकामासाठी आणलेले साहित्य चोरणारा आरोपी पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात...
 आरोपी पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात...


पनवेल दि.१४ (संजय कदम): घराच्या बांधकामासाठी आणलेलं साहित्य चोरणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन घरफोडीच्या गुन्हा उघडकीस आणला आहे.
            पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळूंद्रे गावामधील बंद घरामधून खिडकी द्वारे प्रवेश करून घरातील बांधकामासाठी आणलेल्या साहित्यापैकी एकूण ३७ हजार ८०० रुपये किमतीची वायर अज्ञात चोराने चोरली होती. या बाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.  सदर गुन्ह्याचे तपासामध्ये सदरचा गुन्हा हा काळूंद्रे गावातील मनोज कमलाकर कातकरी याने केला असल्याची खात्रीलायक माहिती तपास पथकास भेटली. या माहितीच्या आधारे मनोज कमलाकर कातकरी याला ताब्यात घेऊन घरफोडीच्या गुन्हा उघडकीस आणला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप. नि अभय शिंदे, पो.हवा. नितीन वाघमारे, परेश म्हात्रे, पो. ना रवींद्र पारधी, विनोद देशमुख, पो. शि. नितीन कांबळे, प्रसाद घरत, साईनाथ मोकळ यांनी केली आहे.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image