करंजाडे वसाहतीतील शेकापक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या...
करंजाडे वसाहतीत शेकापची वाढती ताकत....

पनवेल/प्रतिनिधी -- पनवेल तालुक्यात शेकापची ताकत नक्कीच मोठी आहे. अडचण कुठलीही असो, सत्ता असो की नसो शेकाप च्या कार्यकर्त्यांपर्यत पोहोचला की काम झालंच समजा असे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी करंजाडे वसाहतीतील शेकापच्या नव्या पदाधिकारी नियुक्त्या कार्यक्रमामध्ये रविवारी 21 जानेवारी रोजी बोलताना सांगितले.

यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, मा नागराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, तालुका चिटणीस राजेश केणी, वामन शेळके शेकापनेते, माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज, मा सरपंच रामेश्वर आंग्रे, बबन गायकर, मंगेश बोरकर यांच्यासह कार्यकर्ते, महिला सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतीय राजकारणामध्ये शेकापची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. महाराष्ट्रामध्ये या पक्षाला विशेष स्थान आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये आजही हा पक्ष प्रबळ ठरला आहे .शेतकरी व कामगार यांचे हित जोपासणारा विचार मांडणारा, योजना सुचविणारा असा पक्ष ओळखला जात आहे. त्याचबरोबर या निष्ठावंत कार्यकर्तेबरोबर काम करणारा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे करंजाडे ग्रामपंचायतीचा माजी सरपंच रामेश्वर आंग्रे असल्याचे मा.आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर राजकारणामध्ये हार जीत होत असते. मात्र त्या हार-जीत वर आपल्या कामाचे मूल्यमापन होत नसतं, आपण किती निष्ठेने, चांगले काम करतो, त्याच्यावरच पक्षाचं, समाजाचा स्थान घडत असत असे मत मा.आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी रामेश्वर आंग्रे यांनी सांगितले की, पक्षाची विचारसरणी घेऊन आपण पुढे काम करीत राहू. शेकाप हा तळागाळातील नागरिकांसाठी काम करणारा पक्ष आहे. कोणत्याही कामासाठी सत्तेची गरज असायला पाहिजे असं नाही. करंजाडेचा विकास करायचा आहे. ही नवीन विचारसरणी घेऊन पुढे जात आहोत. पाण्यासाठी लढलो आपण, अविश्राम मेहनत हे ब्रीद वाक्य घेऊन आपल्याला पुढे जायचं असल्याचे आंग्रे यांनी सांगितले. यावेळी तालुका चिटणीस राजेश केणी, हेमा गोतमारे, नीलम भगत, संदीप नायर, सशांक पोयीपकर  यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.



करंजाडेचे डॅशिंग सरपंच म्हणून काम करणारे आहेत. आपण महिलांना त्यांचा हक्क देत असतो. साडेबारा टक्के मिळाले ते दिबा पाटील साहेबानंमुळे मिळाले, त्यामुळे लढल्याशिवाय काहीच मिळत नाही. पाण्यासाठी महिलांनी आघाडी घेतली. करंजाडेकरांनी मोठी चूक केली. चांगल्या कार्यकर्त्यांला पाडलं. त्यामुळे इमानदारीला किंमत राहिली नाही. तरुणांना आज नव्याने संधी दिली जात आहे. त्यांनी जोमाने काम करावे, मात्र कोणत्याही क्षेत्रात हरल्याशिवाय जिंकता येत नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी चांगले काम करावे. करंजाडेकरांनी मोठी चूक केली. चांगल्या कार्यकर्त्यांला पाडलं - 
जे.एम.म्हात्रे - मा.नगराध्यक्ष.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image