अक्षय जाधव आणि मिताली पुरालकर यांनी जिंकला 'नमो चषक गीत गायन' स्पर्धेचा किताब
पनवेल (प्रतिनिधी) भाजपचे मावळ लोकसभा मतदार संघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रासाठी आयोजित करण्यात आलेल्या नमो चषक गीत गायन स्पर्धेचा किताब अक्षय जाधव आणि मिताली पुरालकर यांनी पटकाविला.
देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने भारत देशाने जगात मोठी झेप घेतली. त्याबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार भारतीय युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात 'नमो चषक' स्पर्धा होत आहेत. त्या अनुषंगाने लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा, कला व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला. त्यातील एक भाग असलेली गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली. वय १६ ते २५ आणि २५ ते पुढे अशा दोन गटात हि स्पर्धा झाली. या स्पर्धेत एकूण १६५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पनवेल ग्रामीण व खारघर शहराची ऑडिशन रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल खारघर येथे तर पनवेल शहर, कळंबोली शहर आणि कामोठे शहराची ऑडिशन सीकेटी महाविद्यालय खांदा कॉलनी येथे पार पडली. त्यानंतर या स्पर्धेची अंतिम फेरी सोमवार दिनांक २९ जानेवारीला पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सायंकाळी झाली. १६ ते २५ वर्ष वय गटात प्रथम क्रमांक अक्षय जाधव, द्वितीय क्रमांक उत्कर्ष चंदनशिवे, तृतीय क्रमांक सिद्धी म्हात्रे तर वय २६ ते पुढे या गटात मिताली पुरालकर यांनी प्रथम, द्वितीय क्रमांक दिव्या तांडेल व तृतीय क्रमांक मानसी पंडित यांनी पटकाविले.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, माजी महापौर कविता चौतमोल, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, डॉ. संतोष जाधव, प्रशांत शेटे, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, चिन्मय समेल, दिनेश खानावकर, रोहित जगताप, अभिषेक भोपी, आयोजक रवी नाईक, चंद्रकांत मंजुले,सुहासिनी केकाणे, आदित्य हाणगे, अश्विन सातपुते, उपेंद्र मराठे, मधुकर उरणकर, कोमल कोळी, देवांशू प्रभाळे यांच्यासह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेचे प्राथमिक फेरीचे परीक्षक म्हणून पार्श्व गायक गणेश भगत, शास्त्रीय संगीत शिक्षिका वर्षा लोकरे, रिधिमा लाड व प्रणय पवार तर अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून नामवंत गायक व निर्माता अजित मेस्त्री आणि प्रसिद्ध शास्त्रीय संगीत शिक्षिका संध्या घाडगे यांनी काम पहिले. सर्व विजेत्यांना १० फेब्रुवारीला होणाऱ्या बक्षीस वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.