रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी शिबीर...
पनवेल वैभव / दि.२३(संजय कदम): तुर्भे वाहतुक शाखेमार्फत मजेन्टा कंपनी, तुर्भे एमआयडीसी या ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधुन मजेन्टा कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांना तुर्भे वाहतुक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी वाहतुक नियमांबाबत मार्गदर्शन केले. सदर वेळी मजेन्टा कंपनीमध्ये रस्ता सुरक्षा निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामधील विजेत्यांना प्रोत्साहपर बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच तुर्भे वाहतुक शाखा व मजेंन्टा कंपनी यांच्या संयुक्त विदयमाने मजेन्टा कंपनीचे चालक व कार्यकारी अधिकारी तसेच तुर्भे वाहतुक शाखेचे अंमलदार यांचे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर वेळी मजेंन्टा कंपनीचे एकुण ७० चालक व कार्यकारी अधिकारी तसेच तुर्भे वाहतुक शाखेकडील २१ पोलीस अंमलदार यांनी शिबीराचा लाभ घेतला. रस्ता सुरक्षा खबरदारी आणि त्या इतक्या महत्वाच्या का आहेत याबद्दल लोकांना अधिक जागरूक करण्याची नितांत गरज आहे, त्यामुळेच नवी मुंबई वाहतुक विभागातर्फे रस्ते सुरक्षा अभियान दरवर्षी राबविण्यात येते, त्याअनुषंगाने तिरूपती काकडे, पोलीस उप आयुक्त वाहतुक शाखा व सुनिल बोंडे, सहा. पोलीस आयुक्त, वाहतुक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाला मजेंन्टा कंपनीचे सीईओ मॅक्ससन लीवीस, मजेंन्टा कंपनीचे अधिकारी धर्मिष्टा चौधरी, चेतन महाजन, प्रसाद बेलुसे, महेश शेंडे तसेच पोउपनि महाजन, पोहवा रणजित घोरपडे, पोना संदिप काळे, पोशि विशाल आगुंडे, शिवाजी तेलंगे व मपोशि रेखा गोसावी तुर्भे वाहतुक शाखा हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी मजेन्टा कंपनी येथील ६० ते ७० कर्मचारी उपस्थित होते.
फोटो: तुर्भे वाहतूक शाखे तर्फे रस्ता सुरक्षा अभियान