भाजपा महासचिव विक्रांत पाटील यांच्या कडून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार...
       विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार...


पनवेल, दि.16 (वार्ताहर): पनवेल येथील सूप्रसिद्ध वडाळे तलाव येथे सौ. सरोज जीतेकर यांचा गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्या बद्दल सत्कार करण्यात आला सोबतच सौ निता मंजुळे यांनी भाजपा महिला मोर्चा पनवेल कार्यकारिणी मध्ये निवड झाल्या बद्दल व नवनिर्वाचित सरपंच गोसावी यांचा सत्कार भाजप महासचिव विक्रांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 
           यावेळी बोलताना विक्रांत पाटील यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या तसेच आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करावे असे प्रतिपादन केले. व प्रभागातील केलेली विविध विकास कामे आणि सामाजिक उपक्रम याचा उल्लेख केला. या प्रसंगी मा. कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील तसेच कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.




फोटो: विक्रांत पाटील सत्कार
Comments