बाबासाहेब लीगल पँथर कायदेशीर गणरक्षक फौज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आधार कार्ड शिबीर संपन्न..
     आधार कार्ड शिबीर संपन्न.. 


पनवेल वैभव / दि १४, (संजय कदम) :  ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांची संयुक्त जयंती तसेच 14 जानेवारी मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनाचे औचित्य साधून आयोजित आधार कार्ड शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
               छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि प्रेरणेतून उदयास आलेले बाबासाहेब लीगल पँथर K G F कायदेशीर गण रक्षक फौज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नवीन पनवेल या ठिकाणी आधार कार्ड नवीन नोंदणी करणे तसेच आधार कार्ड अपडेट करणे  शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सदर शिबिराला स्थानिक लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आणि शिबिराचा लाभ घेतला. यावेळी जेष्ठ रिपब्लिकन नेते नरेंद्र गायकवाड, संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रफुल भोसले, ऍड.नीलम भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 




फोटो -  आधार कार्ड शिबीर संपन्न
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image