मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात बैठक...
पनवेल शहर पोलीस ठाण्यात बैठकीचे आयोजन


पनवेल दि.२२(संजय कदम): पनवेल शहर पोलीस ठाणे  हद्दीतील मराठा बांधव यांची सद्यस्थितीत राज्यभरात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.   
      या बैठकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, गोपनीय विभागाचे संजय धायेराव, मराठा समाजाचे विनोद साबळे, प्रवीण जाधव, यतीन देशमुख, रामेश्वर आंग्रे यांच्यासह इतर समाजबांधव उपस्थिती होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी कायदा व सुव्यवस्थेचा दृष्टीने पोलीस ठाणे हद्दीत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य त्या सूचना व मार्गदर्शन केले. 



फोटो: मराठा समाज बैठक
Comments