नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
   उपोषणाला शिवसेनेचा सक्रिय पाठिंबा..

पनवेल दि.०५(संजय कदम): सिडको विरोधात शेतकऱ्यांच्या वतीने नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत ६ डिसेम्बर पासून करण्यात येणाऱ्या आमरण उपोषणाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पूर्णतः पाठिंबा दिला आहे. याबाबत यांच्या शिष्टमंडळाने आज खारघर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना नेते अनंत गीते यांची भेट घेतली असता त्यांनी या शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने असून आमच्या पक्षाचा सक्रिय पाठींबा देत असून या उपोषणात आम्ही सुद्धा सहभागी होऊ असे आश्वासन दिले. 
          यावेळी शिवसेना नेते अंनत गीते यांची जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्ते ऍड सुरेश ठाकूर, अनिल ढवळे, मोहन गवंडी, बबन फडके, दमयंती भगत, शामिनी  ठाणगे, निलेशा भगत, सविता घरत व ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन आमचा पनवेल परिसरात होऊ घातलेल्या "नेंना" प्रकल्पास विरोध असून आत्तापर्यंत आम्ही धरणे आंदोलन, मोर्चे, निवेदन, ग्रामपंचायत ठराव दिले असून प्रशासन शेतकऱ्यांवर हा प्रकल्प लादत आहे. म्हणून त्या विरोधात बुधवार ०६/१२/२०२३ रोजी तुरमाळे फाट्याजवळ प्रकल्पग्रस्तांचे नेतृत्व करणारे नेते मंडळी आमरण उपोषणास बसणार आहेत. तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आम्हाला पाठींबा द्यावा असे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत शिवसेना आपल्या पाठीशी पूर्णपणे उभी असून आम्ही आपल्याला सक्रिय पाठींबा दिला असल्याचे सांगितल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून आला. 



फोटो: शिवसेना नेते अनंत गीते याची आंदोलन कर्त्यांनी घेतलेली भेट
Comments