लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे आंतर शालेय कराओके गायन स्पर्धा संपन्न...
लहान गटात जुई ढोले, मोठ्या गटात स्वर म्हात्रे विजयी..


पनवेल दि १८ (संजय कदम ):  लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम ने आयोजित केलेल्या आंतर शालेय कराओके गायन स्पर्धेला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पनवेल मध्ये प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी अशा 2 टप्प्यात घेण्यात आल्या.           या स्पर्धेमध्ये विजेत्यांची नावे खालील प्रमाणे गट 5वी ते 7वी प्रथम क्रमांक - जुई ढोले, द्वितीय क्रमांक - शुभ्रा कांबळे, तृतीय क्रमांक - आदेश शेडगे, उत्तेजनार्थ - देवश्री घोडके,  स्वरा भुजबळ, गट 8 वी ते 10 वी प्रथम क्रमांक - स्वर म्हात्रे, द्वितीय क्रमांक - माऊली राऊत, तृतीय क्रमांक - जिया फडके उत्तेजनार्थ - साक्षी साबळे, सिमरदीप सिंग हे आहेत, या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रिजन चेअरमन ला. मिलिंद पाटील आणि विशेष अतिथी म्हणून बांठीया हायस्कूलचे मुख्याध्यापक माळी सर उपस्थित होते. ला.मिलिंद पाटील आणि माळी सर यांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपले कलागुण दाखविण्याची संधी मिळाली असल्याचे सांगून या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल सरगम क्लब चे कौतुक केले. क्लबच्या अध्यक्ष ला. स्वाती गोडसे यांनी आमच्या पुढील उपक्रमांना असेच सहकार्य मिळेल हा विश्वास व्यक्त केला आणि या स्पर्धसाठी डिस्ट्रिक्ट कमिटी टॅलेंट हंट चे ला. सुयोग पेंडसे यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. प्राथमिक फेरी साठी ला. संविदा पाटकर आणि ला. संजय गोडसे तर अंतिम फेरीसाठी  विजय मनोहर आणि  विनायक प्रधान यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. मानदा पंडित यांनी केले. या कार्यक्रमाला ला. अलकेश शहा, धवल शहा, एड सुनील देशपांडे तसेच पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.





फोटो -  कराओके गायन स्पर्धा
Comments